Saturday, 6 January 2018

पत्रकार दिन की दीन?

८ नोव्हेंबर २०१६,विमुद्रीकरण झालं त्यादिवशीची गोष्ट. मी माझ्या रूमजवळ कैवल्य आणि प्रसादबरोबर गप्पा मारत होतो. आठ-साडे वाजता १०००-५०० 'कागज के तुकडे' ठरले आणि पाकीटातल्या हजाराची एक आणि पाचशेच्या दोन नोटांनी आपली घटीका बुडल्याची जाणीव दिली.खिशातल्या नोटा डिपॉझिट करणे आणि एटीममधून शंभराच्या काही नोटा मिळवाव्यात हा दुहेरी उद्देश पेरुगेटच्या स्टेट बँकेच्या एटीएमला पुर्ण करायला.
मी आणि प्रसाद लगे हाथ तिकडे पळालो.
      तोपर्यंत बातमी पसरली होती,गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. एटीएम मध्ये एका न्युज चॅनेलचा रिपोर्टर चार-पाच एटीएम कार्ड घेऊन पैसे डिपॉझिट करत होता. त्याच्याकडे बरीच रोकड रक्कम होती, साहजिक त्याला वेळ लागत होता वाढत्या वेळेबरोबर रांग वाढत होती आणि वाढत्या रांगेबरोबर लोकांचा रागही वाढत होता. हा रिपोर्टर बाहेरच्या गोंधळाकडे दुर्लक्ष करून आपलं काम करत होता,शेवटी तो बाहेर पडला आणि डिपॉझिटिंग मशीन काही वेळात मर्यादा पुर्ण झाल्याने बंद पडले.लोक कमालीचे वैतागले होते त्याच्यावर.
             दुसऱ्या दिवशी नंतर हाच रिपोर्टर पुण्यातल्या वेगवेगळ्या एटीएम्ससमोर नागरिक किती काळ रांगेत थांबलेत 'voxpop' करत(रांगेतील लोकांच्या मुलाखती घेत) होता.

हल्ली तत्व,सत्यता,निष्पक्षता वैगेरे सगळे संपले;
आता फक्त स्टोरी,त्याला मिळणाऱ्या हिट्स हे जास्त महत्वाचं ठरतं.(कधीकधी निष्पक्षता आणि अभ्यासपूर्णतेच्या नावाखाली राबवलेला propaganda सुद्धा अंतस्थ हेतू असतो.

तरीसुद्धा 'दर्पणकार' बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन आणि पत्रकार दिनाच्या शुभेच्छा.