ओरमॅक्स सिनेमॅटिक्स नावाची एक कंपनी,सिनेमाच्या first Day opening बद्दल अंदाज लावणे हे तिचे काम.या कंपनीचे अंदाज सिनेमाजगत गांभीर्याने घेतं,सिनेमाचा Buzz,Reach, appeal आणि intrest या चार निकषांवर हे ratings ठरतात,त्यावर सण,परीक्षा,क्रिकेटमॅचेस आणि वातावरण या घटकांचा होणारा परिणाम अभ्यासला जातो आणि रोजच्या रोज त्यानुसार Promotinal strategy ठरवली जाते.ओरमॅक्सने गेल्या आठवड्यात आपली रेटिंग जाहीर केली तेव्हा छपाक तिसऱ्या स्थानी होता,पहिल्या स्थानी तानाजी,दुसऱ्या स्ट्रीट डान्सर.हे बघून दीपकासाठी काम करणाऱ्या PR ने रणनीती आखली आणि Controversy निर्माण करत सिनेमाला फायदा मिळावा यासाठी तीने JNU मध्ये जायचं ठरलं.
थोड्याच वेळात Twitterवर छपाक Trending होता,त्याने सिनेमाची चर्चा वाढली खरी मात्र सिनेमाला अपेक्षित यश मिळाले नाही.आठवडा भरात त्याने केवळ १९.०१ कोटींचा व्यवसाय केला याउलट तानाजीने ६१.७४ कोटींची कमाई केली.'जजमेंटल हैं क्या..' सिनेमापेक्षाही दीपिकाच्या सिनेमाला कमी openings मिळाले.आता तिच्या जाहिरातींच्या प्रक्षेपणात देखील घट आली आहे. व्यवसाय म्हणून एखाद्या हुल्लडबाजी करणाऱ्या जमावात जाऊन स्टंटबाजी करणाऱ्या कलाकारांना,दीपिकाने आवाज उठवला अशा बाळबोध कल्पना असणाऱ्यांना ही देशातील जनतेने लगावलेली 'चपराक' आहे....!