Monday, 26 August 2019

असंताचे संत

स्वतःची दुकानदारी टिकवण्यासाठी राजसत्तेस
लोंबकळणारे धर्मगुरू हे अन्य मर्त्य मानवांइतकेच
सामान्य असतात. मग ते बाबा रामदेव असोत, श्री श्री
रविशंकर असोत की मदर तेरेसा असोत. असल्या
बनावांना संत ठरवण्याची परंपरा सर्व धर्मात असते.
मदर तेरेसा हे याचे ताजे उदाहरण. त्यांच्या कथित
संतपणावर ख्रिस्ती धर्म पीठाने सोमवारी शिक्कामोर्तब
केले. यातून अधोरेखित झाली ती व्यवस्थेची
परस्परपूरकता. म्हणजे व्यवस्थेने स्वतःला अनुकूल
असलेल्यांना संत म्हणायचे आणि या नवसंतांनी
आपल्या कथित समाजसेवा द्वारे ही आंधळी
धर्मव्यवस्था बळकटराहील याची काळजी घ्यायची.
असली बनवेगिरी आणि बनाव यांत ख्रिस्ती धर्मात
जेवढे चातुर्य दाखवले ते समजून घेण्यासाठी
अन्यांना २१ व्या शतकाची वाट पाहावी लागली.
ख्रिस्ती धर्माची ही उद्यमशीलता समजावून घ्यायची
असेल तर त्या धर्माच्या प्रसाराचा इतिहास पाहावा
लागेल, ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला तो त्या धर्मातील
धर्मगुरूंच्या कथित शक्तीमुळे नव्हे. तर या धर्माचा
प्रमुख हाच एके काळी राजसत्तेचा प्रमुख होता
म्हणून. एके काळी रोमन साम्राज्याची सूत्रे धर्मगुरू
पोप यांच्याकडेच होती. म्हणजे धर्मसत्ता आणि
राजसत्ता एकत्रच नांदत. अशी उदाहरणे अन्य
धर्मात आहेत. अलीकडे इस्लाम धर्मातील वहाबी
या कट्टरपंथीयांच्या प्रसाराविषयी बरेच बोलले जाते.
आयसिस हा या वहाबी धर्म विचारांचे प्रतीक. हा
वहाबी पंथ पसरला त्याचे कारण या पंथाचा
संस्थापक मुहम्मद इब्न अब्द अल वहाब याने एका
नव्या, संभाव्य देशाचा संस्थापक महंमद बिन इब्न
सौद याच्याशी हातमिळवणी केल्यामुळे.
राजकारणात स्थिरावू पाहणाऱ्या सौद यास आपली
पापकृत्ये आणि हिंसा माफ करणारी कोणी धर्मसत्ता
हवी होती आणि स्वतःच्या धर्म विचारांचा प्रसार करू
पाहणाऱ्या महंमद वहाब यांस त्यासाठी राजकीय
आश्रय हवा होता. या परस्पर संयोगातून वहाबी पंथ
आणि सौदी अरेबिया यांचा उदय झाला. बौद्ध
धर्माच्या प्रसाराबाबतही असेच सांगता येईल. सम्राट
अशोक आदींच्या काळात हा धर्म पसरलायामागील
कारणही हेच. तेव्हा राजसत्ता आपल्यास उपकारक
ठरणाऱ्या धर्मगुरूंना संतपद देण्यास नेहमीच आतुर
असते.
यावरून मदर तेरेसा यांना संतपद का दिले जाते,
याचे कारण लक्षात वावे. ख्रिस्ती धर्माच्या पात्रता
निकषानुसार किमान दोन तरी चमत्कार संभाव्य
संतांच्या नावावर असावयास हवेत. परंतु हे कारणच
मुदलात बोगस आहे. चमत्कार वगैरे थोतांड हे
संतपदाच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी आणि
दाखवण्यासाठी. प्रत्यक्षात खरा निकष म्हणजे
संभाव्य संताने घडवून आणलेली धर्मांतरे. मदर तेरेसा
या कार्यासाठी विख्यात होत्या. समाजसेवा हे त्यांचे
आवरण. या आवरणाखाली त्यांचा चेहरा होता तो
धर्मांतरासाठी हपापलेल्या व्यक्तीचा. हे कटू सत्य
इतिहासकार विजय प्रसाद ते क्रिस्टोफर हिचेन्स अशा
अनेकांनी सोदाहरण दाखवून दिले आहे. 'व्हाइट वुमन इन रेसिअलाईज्ड स्पेसेस' या ग्रंथात निबंधात प्रसाद यांनी मदर तेरेसा यांना भारत मोठेपणा का मिळाला हे सविस्तरपणे समजावू सांगितले आहे. हिचेन्स एक पाऊल पुढे जात मदर
तेरेसा यांचे वर्णन 'फॅनेटिक, फंडामेंटालिस्ट अँड फ्रॉड' असेच करतात. 'या बाईला संतपद दिले तर उलट गरीब
आणि आजाऱ्यांची संख्या वाढेल', असे हिचेन्स म्हणतात. 'मदर तेरेसा यांना संतपद देणे ही रोमन कॅथलिक चर्चने अंधश्रद्धा आणि दिखाऊपणापुढे पत्करलेली शरणागती आहे', असेच त्यांचे मत आहे आणि कोणीही बुद्धिवादी व्यक्ती त्यांच्याशी असहमत होणार
नाही. मदर तेरेसा यांना गरिबांच्या, जराजर्जर, जरत्कारू अशांच्या उदात्तीकरण रस होता.या अशा रंजल्यागांजलेल्यांची आपण सेवा करतो, असा
त्यांचा दावा होता. त्यासाठी त्यांनी अनेक वैद्यकीय
केंद्रे स्थापन केल्याचा दाखला दिला जातो. परंतु
वैद्यकीय केंद्रे अकार्यक्षम ठेवली गेली होती, ते
साधनसुविधांच्या जोडीला किमान स्वच्छतेचा अभाव असे, हे अनेक पाश्चात्त्य लेखकांनी दाखवून
दिले आहे. यामागील गंभीर बाब म्हणजे हे सर्व
जाणूनबुजून केले जात असे. वा वैद्यकीय केंद्रात
साधी वेदनाशामक देखील नसते. आर्थिक मदतीत
आणि पैशाच्या अखंड स्रोतात आकंठ डुंबणाऱ्या
मदर तेरेसा आणि त्यांच्या संस्थांनी त्यांच्याकडील वैद्यकीय व्यवस्था परिपूर्ण म्हणून त्यांना केल्या नाहीत कारण त्यांना वेदनेच्या प्रदर्शनाचे आकर्षण होते. अशा वेदनांमुळे वर्तन करीत स्वार्थ कळवळणाऱ्याच्या चेहऱ्यावरून आपण मायेचा हात कसा फिरवतो हे दाखवण्यात मदर तेरेसा आनंद मानत. 'या वेदना किती सुंदर आहेत. त्यातून जग बरेच काही शिकते',असे खुद्द मदर तेरेसाच हिचेन्स यांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या.
जवळपास १०० देशांत शाखा असणाऱ्या या मदर
ओळखल्या जातात त्या भारतीय म्हणून. याचे कारण
या देशातील गुलामी मानसिकता. कोणी तरी गोरी
व्यक्ती आपल्याविषयी सहानुभूती दाखवते याचे
अजूनही येथील शिकल्यासवरलेल्यांस अप्रूप. तेव्हा
बातांत काही अर्थ नाही. धर्म आणि राजसत्तेला पूख
असे वर्तन करीत स्वार्थ आणि परमार्थ साधल्याची ई
बक्षिसी आहे. या असल्या बेगडी संतमहंतांची ताक
जर खरी असती तर मदर तेरेसा ज्या संस्कृतीतून
येतात त्याच पाश्चात्त्य संस्कृतीने विज्ञान आणि
संशोधनात वेळ घालवला नसता.
यातून दिसते ते इतकेच की मानवी प्रज्ञा विज्ञान
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवनव्या संशोधनाने गगनाला
गवसणी घालू पाहत असली तरी त्याच काळातील
धर्म संस्था मात्र मागास राहण्यातच धन्यता मानते
पृथ्वी सपाट नाही, गोल आहे असे पंधराव्या शतकात
सांगणाऱ्या गॅलिलिओ यांस छळणारे आणि मदर
तेरेसा यांच्या चमत्काराच्या कंड्या पिकवणारे ख्रिस्त
धर्मगुरू हे एकाच काळाचे प्रतिनिधित्व करतात.
असले मागास धर्मगुरू हीच काय ती सर्व धर्माचे
मानवजातीला देणगी. मग ते मुलगा व्हावा यासाठी
गर्भसंस्कारांचे थोतांड विकणारे बालाजी असो
किंवा स्वतःला रामाचा अवतार म्हणवून घेत
धाकट्या भावाला लक्ष्मण आणि दागिन्यांनी मढलेली
पत्नीस सीतामाई ठरवत बौद्धिकदृष्ट्या अजाग
भक्तांचे आर्थिक, लैंगिक शोषण करणारे कोण
बाबा बापू असोत. हे सर्वच एका माळेचे मणी
अलीकडच्या काळात असल्या संतांचा फार
सुळसुळाट वाढला असून हे समाजाच्या ढासळत्य
सामाजिक आरोग्याचे निदर्शक आहे. 'असंगाशी
संग, प्राणाशी गाठ', असा सल्ला खरे संत देतात
असंतांचे संत म्हटल्याचा परिणामही असाच असेल.

Tuesday, 30 July 2019

Tiger census

On the occasion of Global Tiger Day,29 July,Prime Minister Narendra Modi reassured India’s commitment to protecting tigers. Releasing the four-yearly report of the All-India Tiger Estimation, Modi said that the number of tigers in India stands at around 3,000 today. “India is one of the safest habitats for tigers,” he added.
“The story which started from ‘Ek Tha Tiger’ and reached to ‘Tiger Zinda hai’,shouldn’t end there,” PM Modi said, adding that the results of the just declared tiger census would make every Indian happy. “Nine years ago, it was decided in St. Petersburg that target of doubling tiger population will be 2022. We completed this target 4 years early,” he said.

        ‘status of tigers,CO-predators,prey and their habitat 2018’ released by National Tiger Conservation Authority last day.The survey observed 2967 tigers in their specific habitats.The growth of 33% is quite significant as compared with the previous data.There were only 1411 big cats in India in 2006 followed by 2226 in the year of 2014.

        The census was carried out in four phases.Phases 1 and 2 covered forest beats, generally spread over 15 sq km each, by Forest Departments, to collect signs of tiger presence like scat and pug-marks. Census enumerators walked paths called line transects to estimate the abundance of prey. This was followed by sampling of plots along the transects to assess habitat characteristics, human impact, and prey dung density.In phase 3, the information was plotted on the forest map prepared with remote-sensing and GIS application. Sample areas were divided in 2-sq-km parcels, and trap cameras were laid in these grids.

         In the last phase, data were extrapolated to areas where cameras could not be deployed.Report says the census is the world’s most extensive biodiversity mapping exercise so far . A total 3,81,400 sq km of forests were surveyed;3,17,958 habitat plots were sampled for vegetation and prey dung. There were 26,838 camera trap locations, which covered 1,21,337 sq km.A staggering 3,48,58,623 wildlife pictures were captured. Of them, 76,651 were of tigers; 51,777 of leopards. The entire effort consumed 5,93,882 man days.Camera traps deployment leads to increase in tiger photographs.It is actually notable that ministry of environment and forest moved on from pug-mark based model to scientific camera model developed by wildlife institute of India.(WII).

   Though the population of tigers increased there are certain worrying aspects.First,Reports computes the loss of 17,881 sq.km area which is 20% tiger habitats in four years,this is quite alarming as it suggests the tussle between human and tigers in upcoming days.Second,report recorded potential extirpation of tigers in three tiger reserves Buxa(west Bengal),Dampa (Mizoram),Dalama (Jharkhand).These reserves listed poor in management effectiveness evaluation,released with tiger Census.
      
          In conclusion,India has achieved a remarkable growth in tiger conservation with efficient conservation measures but authorities also need to minimise the regional unevenness in tiger population.

Monday, 7 January 2019

इधर भी अक्ल के दुष्मन,उधर भी दीवाने

साहित्य संमेलनातून काय साधते?हा एक चिरंतन प्रश्न आहे.त्याने ना मराठी साहित्याचा प्रसार होतो ना साहित्यातील नव्या प्रवाहांवर मंथन.निवडणुका, मानापमान आणि 'वाचकांनी फिरवली पाठ' अशा बातम्या सोडल्या तर फारसे काही दिसत नाही.गेले काही वर्षे ज्यांचे 'साहित्यिक कर्तृत्व काय?' असा प्रश्न पडावा असेच महनीय अध्यक्ष संमेलनाला लाभले हे किती भाग्याचे!इंदिरा संत सारख्या सिद्धहस्त कवियत्रीचा एकेकाळी पराभव झाला या अध्यक्षीय निवडणुकीत.
८२ व्या साहित्य संमेलनात तर कौतिकराव ठाले पाटलांनी स्व.यशवंतरावांबद्दल अनुद्गार काढून आपण किती खुजे आहोत हे पटवून दिले,भरीस भर म्हणून माजी अध्यक्ष अरुण साधूंना अपमानास्पद वागणूक दिली गेली.

आनंद यादवांच्या कादंबरीकार तेव्हा वाद झाल्याने त्यांचे  साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद गेले.तो राजीनामा स्वीकारला गेला की नाही हे सुद्धा जाहीर केला गेला नाही हे मोठे दुर्दैव आहे.आज तीच लोकं छातीठोकपणे अभिव्यक्तीच्या पिपाण्या वाजवतात हे पाहून हसू येते.
नयनताराबाईंची बाजू घेणारे किती लोक पुण्यात गुलजारांना का बोलावलं म्हणून कंठशोष करत होते.हे नवल.लेखकांची मते सरकारच्या विरोधात असू शकतात ही जाहीर भूमिका त्यांनी(दुर्गाबाईंनी) आणीबाणीच्या काळात घेतली आणि पुढे जनता सरकारने देऊ केलेले मंत्रीपदही नाकारले.(नयनतारा सहगल तेव्ह कुठे होत्या असं काही लोकं विचारतील देखील.)आजच्या किती साहित्यिकांमध्ये हे धाडस आहे ?

गरज पडल्यास सरकार आणि विचारवंतांचे कान उपटणाऱ्या दुर्गाबाई आज नाहीत.एकेकाळी इतिहासाचार्य राजवाडे, डॉ. श्री. व्यं. केतकर, शेजवलकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, सेतुमाधवराव पगडी, नरहर कुरुंदकर, दुर्गाबाई भागवत,गं. बा. सरदार, दि. के. बेडेकर यांच्या विचारांचा धार्जिणा महाराष्ट्र आज स्वागताध्यक्षाच्या खर्चावर संमेलने ओढतो आहे,त्यावर वावदूक वाद घालतो आहे हे चित्र अत्यंत भीषण आहे.संमेलनाच्या पटलावरून राजकीय भाषण करू इच्छिणाऱ्या नयनतारा सहगलही शहाण्या म्हणता येणार नाहीत आणि त्यांचं दिलं गेलेलं निमंत्रण रद्द करणारेदेखील नाहीत.एकूणच काय,

जुनूं का दौर है किस किसको समझाएं
इधर भी अक्ल के दुष्मन, उधर भी दीवाने..

हेच काय ते वास्तव.