Saturday, 31 December 2022


1) वाटेवरल्या सावल्या - ग.दि. मा.
2) लता मंगेशकर - हरीश भिमानी 
3) मोठी तिची सावली - मीना मंगेशकर
4) श्री वेंकटेश्वर आणि कालहस्तीश्वर - रां. चि. ढेरे
5) राजर्षी शाहु महाराज - धनंजय कीर
6) आनंदनायकी - रां. चि. ढेरे
7) धुरंधर - कौस्तुभ कस्तुरे
8) गुलमोहर- व.पु. काळे
9) आपुलकी - पुलं
10) मराठी वाङ्म्याचा गाळीव इतिहास - पुलं
11) सोयरे सकळ - सुनीता देशपांडे
12) पुन्हा यादोंकी बारात - शिरीष कणेकर
13) मुस्लिम मनाचा शोध -शेषराव मोरे
14) चिनारच्या ज्वाला - शेख अब्दुल्ला
15)काश्मिर धुमसते बर्फ -जगमोहन
16) एल्फिन्स्टन -प्रमोद ओक
17) ३५ दिवस -जितेंद्र दीक्षित
18) गेम ऑफ थ्रोन्स:मराठी पटकथा - संजय आवटे  
   (दोन्ही महाराष्ट्रातील राजकारणावर आधारित)
19)चिनी महासत्तेचा उदय -सतीश बागल 
20)रावण: राजा राक्षसांचा - शरद तांदळे
21) Karunanidhi: A Life in Politics by Sandhya Ravishankar
22) Maverick Messiah by Ramesh Kandula
23) Bravehearts of Bharat by Vikram Sampath
24) JUSTICE FOR THE JUDGE: AN AUTOBIOGRAPHY by RANJAN GOGOI
25) RENAISSANCE STATE: Girish Kuber
26) Durbar - Tavleen Singh

Wednesday, 28 December 2022

उपभोगशून्य स्वामी...


‘उश्ता अह्माइ यह्माइ उश्ता कह्याइचीत्’ 

ज्याच्यामुळे सर्वांस प्रकाश मिळतो,त्यास प्रकाश प्राप्त होतो.(यस्‍न ४३·१)

वारसा नशिबाने मिळतो,आई-बापाची कर्म स्थानं मुलानातवांच्या कुंडलीत लाभस्थानी प्रकटतात,त्यांनी कष्ट करताना गाळलेल्या घर्मबिंदुमुळे पुढच्या पिढयांना मोत्याचे घास खायला मिळतात.भारतात वारसदार राजकारण्यांचा आणि कलाकारांचाच बघायची प्रथा आहे.त्यामुळे गांधी आणि कपुर आदी पिढ्यांचे सध्याचे वारस स्वतःला सिद्ध करण्यात कितीही कमी पडत असतील तरीही त्यांची तळी उचलणाऱ्यांची संख्या कमी नाही.क्रिकेटसारख्या खेळात लाला अमरनाथच्या पोटी आलेल्या मोहिंदर अमरनाथ वगळता कुणी फारशा धावा  धावफलकावर  लावल्या नाहीत.(योगराज सिंग हे काही यशस्वी क्रिकेटपटू नव्हेत.) त्यामुळे वारसा चालवताना लायक असलेल्या बिर्ला,बजाज,महिंद्रा,वाडिया,टाटा,अंबानी सारख्या घराण्याकडे चटकन आपल्या समाजवादाच्या प्रभावाने संकुचित झालेल्या नजरा जात नाहीत.
यातल्या इतर उद्योजक घराण्याकडे भाऊबंदकीदेखील आहे टाटा त्याला अपवाद.'बापसे बेटा सवाई ..'म्हणून नुसेरवान-जमशेटजींपासून सुरु झालेली परंपरा टाटा समूहाच्या ‘हुमत’ (सद्विचार), ‘हूख्त’ (सदुक्ती) व ‘ह्वर्श्त’ (सत्कृती) या त्रिसूत्रीला जागत रतन टाटांपर्यंत यशस्वीपणे पेलली गेली.

भारतीय उद्योगांचे खच्चीकरण करण्याच्या ब्रिटिश कालखंडापासून ते ‘आपल्याच’ उद्योगांचे पंख छाटण्याच्या  काळापर्यंत संघर्ष केलेल्या टाटांनी रोवलेल्या पोलादी मुळांचा वृक्ष उदारीकरणानंतर अजूनच फोफावला याचं जितकं श्रेय जेआरडींना तितकंच रतन टाटांना देखील.स्वत:च्या सोईसाठी सरकारी धोरणे बदलायला न लावणारा,पार्टीजला न जाता एकांतात विकेंड घालवणारा,स्वतःच्या आजारी श्वानांची काळजी घेण्यासाठी ब्रिटिश राजपरिवाराचा शाही सोहळा नाकारणारा, अपमानास्पद वागणूक देणाऱ्या ‘फोर्ड’ला धडा शिकवणारा, मध्यमवर्गीय भारतीयांच्या कारचं स्वप्न पूर्ण करणारा,किफायतशीर किंमतीत मोबाईल कॉल सुरू करणारा,जेआरडींच्या एअर इंडियाला परत मिळवणारा आणि दानधर्म करताना हात आखडता न घेणारा हा माणुस भारतीय असणं हे जितकं अभिमानाचं आहे तितकंच त्याच्या काळात जगणं गौरवाचं होतं! पारशी धर्मग्रंथ अवेस्तामध्ये सत्कर्म केल्याने आपण या जगात अमर होतो आणि आत्मिक जगात वैभवशाली उत्तम स्वर्ग प्राप्त करतो (यस्ना 43.1)असं वचन आहे. पृथ्वीवरचा पसारा आवरून इहलोकी प्रस्थान केलेल्या रतन टाटांना अशाच जागी स्थान मिळेल कदाचित....!
रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Sunday, 2 October 2022

लालबहादूर

वेलेफ् हँगेन यांनी 'After Nehru Who'' या आपल्यापुस्तकात पंतप्रधानपदाची क्षमता असलेल्या आठ व्यक्तींची यादी दिली होती : लाल बहाद्दूरशास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, व्ही. के. कृष्ण मेनन, यशवंतराव चव्हाण, जयप्रकाश नारायण, स. का. पाटील आणि बी. एम. कौल असे ते व्यक्ती.लाल बहादूर शास्त्री नावाच्या माणसात कुठलं glamour नव्हतंच मुळी.ना परदेशी शिक्षणाचं वलय ना गव्हर्नर जनरलशी मेजवान्यांत मदिरेचे चषक भिडवण्याची मिरासदारी.बरं व्यक्तिमत्त्व म्हणावं तर उंची बेताचीच,वक्तृत्वात आवेशापेक्षा आर्जवच जास्त.नेहरुंच्या राजबिलोरी प्रतिमेला गांधींचा राजकीय वारस असण्याचं तपोबलही प्राप्त होते,शास्त्रींच्या प्रतिमेला ते ही नाही.पत्रकारांचे चोचले पुरवत 'खाना' देण्याची दिलदार(!) वृत्तीही त्यांच्या मध्यमवर्गीय मानसिकतेत नव्हती.थोडक्यात भारतात प्रसिध्द होण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या क्षेत्रात शास्त्रींना काठावर गुणही मिळत नव्हते.

परंतु प्रसिद्धीपेक्षा पराकाष्ठेला किंमत देण्याचा तो काळ, एक खरा गांधीवादी,निस्पृह कार्यकर्ता आणि तितकाच कार्यक्षम म्हणून नेहरुंनी शास्त्रींना आपला अघोषित वारस नेमले होते.आजवर कुठल्याच पंतप्रधानाला एकाच वेळी झेलावी लागणार नाहीत इतकी आव्हानं अवघ्या १८ महिन्याच्या कारकिर्दीत त्यांनी पेलली,ती पेलत असतानाच आकस्मिक मृत्यूने त्यांना गाठलं.पण या शास्त्रींना (देखील) दिल्लीच्या ल्युटन्स वर्तुळाने फार पाण्यात पाहिलं, मानसन्मान तर सोडाच विजयालक्ष्मी पंडित यांनी 'तीन मुर्ती' भवन वरून शास्त्रींना अपमानास्पद वागणूक दिली होती ( शास्त्री पंतप्रधानपदी असतानाही.)त्यांच्या वारसांपैकी कुणी 'आम्ही चालवू हा पुढे वारसा' म्हणत पदे मिळवली नाहीत,की स्वत: शास्त्रींच्या स्मृतीला त्यांच्या पक्षाने,काँग्रेसनेही कधी फारशी किंमत दिली नाही. 
कारण, लाल बहादूर शास्त्री नावाच्या माणसात कुठलं glamour कसं असेल....