Wednesday, 30 December 2015

एक कवी


एका कवीच आयुष्य
असतच तस जगावेगळ,
डागाळलेल्या पातेल्यातुन
घोटभर चहा उकळवताना,
तो बघतो कवितेत
स्वर्गातल्या अमृताची सुवर्णपात्रे,
त्याच्या कळकट्ट घराची तावदानं
सकाळी किलकिली करताना...
लिहीता येतात त्याला रम्य सूर्योदयाची वर्णन.
दारात आलेले चिमणे-कावळेही
त्याला मोर-राजहंस वाटू शकतात.
रस्त्यावरच्या पाणवठ्यातुन
मानससरोवराचा भास होतो त्याला,
घराच्या गळक्या कौलातुन
ठिबकणार पाणी बघताना
अनुभवतो श्रावणसरीची तीव्र झरझर...
चंद्राच्या चटोर किरणात सापडतो त्याला रोमान्स
आणि कुब्जेच्या कुबडात सौंदर्यदेखील.
जुन्या फ्लाँवरपॉटमधला निष्प्राण फुलात
तो हुंगतो बकूळाचा सुगंध
घरातल्या एखाद्या तुटक्या फ्रेमवर
लिहीता येत त्याला महाकाव्य.
आयुष्याची जीवनगाणी संपवून,
आपल्या निष्प्राण कुड़ीला
जेव्हा फेकल त्याने दुनियेबाहेरच्या निर्वातात
(तसा तो या जगी होताच कधी म्हणा !)
तेव्हा उरली होती मागे
एक जीर्ण वही,
एक गळकं शाईच पेन,
आणि जन्मभर पुरणार आनंदाच संचित....!
                                              -निखील

Monday, 28 December 2015

सीतारामाची भलावण

प.बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची परीषद कोलकाताला पार पडली.गेला बराच काळ सत्तेत असल्याने अशा परीषदेची गरज पूर्वी कम्युनिस्टांना वाटली नव्हती.बंगालमध्ये डाव्याची एकाअर्थी monopoly,त्यांच्या त्या अवकाशाला धक्का लावला तो ममतांनी 2011 मध्ये.यानंतर बंगाल मध्ये तृणमुल विरुद्ध डावे असे सामने खेळले जातील असा अंदाज बांधला जात असताना भाजपाने केंद्रात सत्ता मिळवली आणि बंगालमध्ये आपली ताकद वाढवण्याकडे 'शतप्रतिशत' कल दाखवला आणि सामना तिरंगी झाला.
          काल झालेल्या परीषदेत सीताराम येचुरींनी तेच गाण (की रडगाण) पुन्हा गायल.वर्गसंघर्ष,कम्युनिलीझम-सेक्युलिरीझमच टेबलटेनिस खेळल.आणि वृंदा करात यांनी केंद्रातुन 'भाजप हटाव,देश बचाव'च्या घोषणा दिल्या.(म्हणजे नक्की काय करायच हे मला अजुनही समजल नाही) हि परीषद बंगाल निवडणुकीचा शंखनाद होता...सीताराम येचुरी यांनी आपल्या जराजीर्ण झालेल्या पक्षसंघटनेत प्राण फुंकायचा प्रयत्न केला खरा,पण तो पुन्हा तितकाच ठोकळेबाज आणि पोथीनिष्ठ होता.भारतीय समाजमनाशी CPIची नाळ तुटली ती याच कारणामुळे,पक्षाच्या संघटनेत आणि ढांच्यात काडीचाही बदल न करता त्याच्या ताकदीवर यश मिळवण म्हणूनच केवळ सीतारामाची भलावण ठरते.

Friday, 25 December 2015

पथिक

हातोंमे जलता दिप लिए
अँधियारेसे जो चला पथिक,
चढती राते,बिखरते सपने
तममाया की प्रतिबिंबसे
भरमाई किस्मत की आँखे
घटाई काली छाये कितनी?
तूफानोंने डाला डेरा,
दिप संभाले,तत्व ना छोड़े,
यात्री करता रहा उजियारा
देख के उस दिप की ज्वाला
हजारों और ललकार उठे,
तेजपुंज ओज की आभासे
सवेरे नव साकार हुए।
'अटल' अविचल निश्चयसे उसके
आज दशोंदिशाए उजागर हैं,
कभी दिप लिए भटकता यात्री
आज सहस्त्ररश्मी नवभास्कर हैं ।।©
                                              -निखील


Monday, 14 December 2015

फुटपाथचा दर्द


त्या सुनसान रात्री
भुंकणार्या कुत्र्यांच्या आवाजात
रातकिड्यांच्या किरकिरित
सडकच्या किनारी,
आपल्या भेळपुरीचा ठेला आवरुन
फुटपाथवर पथारी पसरून
झोपी गेलेल्या गजोधरला
अचानक आवाज आया,
यहाँ पे क्यूँ आया रे तु ?
यहाँ कुछ नही हैं....
गर्दीने भरलेली खाली रस्ते,
सूना-सूनासा ट्राफिक
धावत पळत जगणारे चाकरमाने
आणि या सब लोकांकडून तुडवला जाणारा
हा निर्जीव फुटपाथ...
इसी पे सोना पड़ेगा तुझे
ये फुटपाथ रोता हैं,बिलखता हैं
चिखता हैं,चिल्लाता हैं
करहाता हैं,मुस्काता हैं...
दस बारा साल पहले यही
वो सडक के बाजुमें
'उसने' ने रौंदा था चार-दोन लोगोंको
शराब में धुत
नशे में चूर.....
फिर क्या होना था
वही अदालते,वो इल्जामात
सबूत आणि पुरावे
साक्षीदाराच्या उलटतपासण्या
ऑर्डर ऑर्डर ऑर्डर....
सबूतों और गवाहों को मद्दे नजर रख्ते हुए
कैद इ उम्र
ऑर्डर ऑर्डर ऑर्डर....
नाही नाही
फिर एक बार वो दलीले,वो अपीले
ऑर्डर ऑर्डर ऑर्डर....
सुबतच नाहीत...
कसली सजा?
"बाइजत बरी किया जाता हैं"
ऑर्डर ऑर्डर ऑर्डर....
अंधारात हरवणारी जिंदगी
स्ट्रीट लाइटच्या प्रकाशात उजळणारी मौत

त्या सुनसान रात्री
भुंकणार्या कुत्र्यांच्या आवाजात
रातकिड्यांच्या किरकिरित
गजोधरनी डोळे चोळत म्हणाला...
छोड़ ना यार
पिया हुआ हैं क्या?
गरीब की जिंदगी कहाँ जिंदगी होती हैं भाई...

आमेन