वेलेफ् हँगेन यांनी 'After Nehru Who'' या आपल्यापुस्तकात पंतप्रधानपदाची क्षमता असलेल्या आठ व्यक्तींची यादी दिली होती : लाल बहाद्दूरशास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, व्ही. के. कृष्ण मेनन, यशवंतराव चव्हाण, जयप्रकाश नारायण, स. का. पाटील आणि बी. एम. कौल असे ते व्यक्ती.लाल बहादूर शास्त्री नावाच्या माणसात कुठलं glamour नव्हतंच मुळी.ना परदेशी शिक्षणाचं वलय ना गव्हर्नर जनरलशी मेजवान्यांत मदिरेचे चषक भिडवण्याची मिरासदारी.बरं व्यक्तिमत्त्व म्हणावं तर उंची बेताचीच,वक्तृत्वात आवेशापेक्षा आर्जवच जास्त.नेहरुंच्या राजबिलोरी प्रतिमेला गांधींचा राजकीय वारस असण्याचं तपोबलही प्राप्त होते,शास्त्रींच्या प्रतिमेला ते ही नाही.पत्रकारांचे चोचले पुरवत 'खाना' देण्याची दिलदार(!) वृत्तीही त्यांच्या मध्यमवर्गीय मानसिकतेत नव्हती.थोडक्यात भारतात प्रसिध्द होण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या क्षेत्रात शास्त्रींना काठावर गुणही मिळत नव्हते.
परंतु प्रसिद्धीपेक्षा पराकाष्ठेला किंमत देण्याचा तो काळ, एक खरा गांधीवादी,निस्पृह कार्यकर्ता आणि तितकाच कार्यक्षम म्हणून नेहरुंनी शास्त्रींना आपला अघोषित वारस नेमले होते.आजवर कुठल्याच पंतप्रधानाला एकाच वेळी झेलावी लागणार नाहीत इतकी आव्हानं अवघ्या १८ महिन्याच्या कारकिर्दीत त्यांनी पेलली,ती पेलत असतानाच आकस्मिक मृत्यूने त्यांना गाठलं.पण या शास्त्रींना (देखील) दिल्लीच्या ल्युटन्स वर्तुळाने फार पाण्यात पाहिलं, मानसन्मान तर सोडाच विजयालक्ष्मी पंडित यांनी 'तीन मुर्ती' भवन वरून शास्त्रींना अपमानास्पद वागणूक दिली होती ( शास्त्री पंतप्रधानपदी असतानाही.)त्यांच्या वारसांपैकी कुणी 'आम्ही चालवू हा पुढे वारसा' म्हणत पदे मिळवली नाहीत,की स्वत: शास्त्रींच्या स्मृतीला त्यांच्या पक्षाने,काँग्रेसनेही कधी फारशी किंमत दिली नाही.
कारण, लाल बहादूर शास्त्री नावाच्या माणसात कुठलं glamour कसं असेल....