साहित्य संमेलनातून काय साधते?हा एक चिरंतन प्रश्न आहे.त्याने ना मराठी साहित्याचा प्रसार होतो ना साहित्यातील नव्या प्रवाहांवर मंथन.निवडणुका, मानापमान आणि 'वाचकांनी फिरवली पाठ' अशा बातम्या सोडल्या तर फारसे काही दिसत नाही.गेले काही वर्षे ज्यांचे 'साहित्यिक कर्तृत्व काय?' असा प्रश्न पडावा असेच महनीय अध्यक्ष संमेलनाला लाभले हे किती भाग्याचे!इंदिरा संत सारख्या सिद्धहस्त कवियत्रीचा एकेकाळी पराभव झाला या अध्यक्षीय निवडणुकीत.
८२ व्या साहित्य संमेलनात तर कौतिकराव ठाले पाटलांनी स्व.यशवंतरावांबद्दल अनुद्गार काढून आपण किती खुजे आहोत हे पटवून दिले,भरीस भर म्हणून माजी अध्यक्ष अरुण साधूंना अपमानास्पद वागणूक दिली गेली.
आनंद यादवांच्या कादंबरीकार तेव्हा वाद झाल्याने त्यांचे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद गेले.तो राजीनामा स्वीकारला गेला की नाही हे सुद्धा जाहीर केला गेला नाही हे मोठे दुर्दैव आहे.आज तीच लोकं छातीठोकपणे अभिव्यक्तीच्या पिपाण्या वाजवतात हे पाहून हसू येते.
नयनताराबाईंची बाजू घेणारे किती लोक पुण्यात गुलजारांना का बोलावलं म्हणून कंठशोष करत होते.हे नवल.लेखकांची मते सरकारच्या विरोधात असू शकतात ही जाहीर भूमिका त्यांनी(दुर्गाबाईंनी) आणीबाणीच्या काळात घेतली आणि पुढे जनता सरकारने देऊ केलेले मंत्रीपदही नाकारले.(नयनतारा सहगल तेव्ह कुठे होत्या असं काही लोकं विचारतील देखील.)आजच्या किती साहित्यिकांमध्ये हे धाडस आहे ?
गरज पडल्यास सरकार आणि विचारवंतांचे कान उपटणाऱ्या दुर्गाबाई आज नाहीत.एकेकाळी इतिहासाचार्य राजवाडे, डॉ. श्री. व्यं. केतकर, शेजवलकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, सेतुमाधवराव पगडी, नरहर कुरुंदकर, दुर्गाबाई भागवत,गं. बा. सरदार, दि. के. बेडेकर यांच्या विचारांचा धार्जिणा महाराष्ट्र आज स्वागताध्यक्षाच्या खर्चावर संमेलने ओढतो आहे,त्यावर वावदूक वाद घालतो आहे हे चित्र अत्यंत भीषण आहे.संमेलनाच्या पटलावरून राजकीय भाषण करू इच्छिणाऱ्या नयनतारा सहगलही शहाण्या म्हणता येणार नाहीत आणि त्यांचं दिलं गेलेलं निमंत्रण रद्द करणारेदेखील नाहीत.एकूणच काय,
जुनूं का दौर है किस किसको समझाएं
इधर भी अक्ल के दुष्मन, उधर भी दीवाने..
हेच काय ते वास्तव.
No comments:
Post a Comment