Wednesday, 26 May 2021

      'जीवन दुःखमय आहे' हे बुद्ध मान्य करतो म्हणून तो मोठा ठरतो, ‘आयुष्य आनंदी आहे फक्त दृष्टिकोन बदला’सारख्या positivity trap मध्ये तो स्वतः अडकत नाही आणि म्हणूनच इतरांनाही अडकवत नाही. ‘मी मोक्षदाता नाही तर मोक्षपथदाता आहे.’ इतकी स्पष्टता त्याच्या ठायी आहे,देव आहे वा नाही या आभासी प्रश्नांपेक्षा जगण्याचे वास्तविक प्रश्नांना तो थेट भिडतो,आपल्या बरोबर इतरांना त्या मार्गात येण्याचा मध्यम मार्ग-‘मज्जमिका’ दाखवतो,त्या मार्गावरून निब्बान प्राप्त होऊ शकते अशी त्याला खात्री आहे तथागतानी निब्बान विषयी भंते पटीसेन यांना उपदेश करताना म्हटले जो राखून बोलतो,विचारांचा संयम करतो,जो आपल्या देहाने दुसर्‍यास उपद्रव करीत नाही असा मनुष्य निब्बान मिळवू शकतो.राजपुत्र असलेल्या आणि सर्वसंगपरित्याग केलेल्या गौतमाबद्दल भारतीय समाजमनात एक उपजत आदर आहे,(याचं कारण दुसऱ्याने केलेला त्याग हा आपल्याला अतिप्रिय आहे. )त्याची तत्व अनेक रूपात पुढे येत गेली,अगदी गांधीजींच्या तात्त्विक गाभ्यात वैष्णव परंपरेसारखीच बुद्धाची परंपराही सापडते,याचं कारण बुद्धाच्या स्पष्टतेत आहे,हि स्पष्टताच त्याला मोठं बनवते,एखाद्या चिरातन बोधीवृक्षासारखी......!

No comments:

Post a Comment