असदुद्दिन ओवेसी यांनी परवा ‘मी भारत माता कि जय’
म्हणणार नाही अशी ‘जाहीर’ वक्तव्य केलं,काल त्यांचीच री ओढत वारीस पठाण यांनी
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशी घोषणा द्यायला नकार दिला आणि त्यांच्यावर
सर्वपक्षीय टीका झाली,त्यातून त्यांच निलंबनही झाल.ओवेसींच्या विधानाचा अर्थ थोडं
मागे जाऊन लावायला हवा.फेब्रुवारीत जेएनयु मध्ये जे काही घडले,ज्या देशविरोधी
घोषणा दिल्या गेल्या त्या अयोग्यच होत्या यात शंका नाही.पण देशातील बऱ्याच
विचारवंतांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला देत ‘त्या’ तरुणांवर कारवाई नको असा
सूर लावला.मग भारताच्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेची व्यापक चर्चासत्र घडू लागली.त्यातून
निर्माण होणारी मते साहजिकच 'उजव्या' राष्ट्रवादाच्या विरोधात होती.देशविरोधी घोषणा
दिल्या तरी आपल्या राष्ट्रभक्तीला(?) बाधा येत नसल्याने ओवेसींनादेखील आपल्या एका विधानावर
इतकी टीका होईल याची अपेक्षा नसावी.
युरोपीयन राष्ट्रवादाची संकल्पना आणि भारताची संकल्पना यात मुलभूत फरक आहे,त्यांचा राष्ट्रवाद हा exclusion-centric आहे तर आपला ‘वसुधैव:कुटुंबकम’
मानणारा.अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी आपण सरळ ‘पाश्चिमात्यांकडे ते किती लिबरल
आहेत’ म्हणून बोट दाखवतो परंतु त्याचवेळेला त्यांच्या देशभक्तीचा आदर्श आम्ही
सोयीस्करपणे विसरतो.महायुद्धात प्रत्येक घरातील एक जण गेल्याने हे राष्ट्रप्रेम
आतून येणारं आहे,त्याचवेळी आपण महासत्ता असल्याचा अभिमान अमेरिकेला राष्ट्रवादी
बनवतो.सततची युद्धे,असुरक्षितता यामुळे इस्त्रायल पराकोटीचा राष्ट्रवादी.भारतात
असं काहीच नाही.पारतंत्र्याच्या झळा सोसलेली पिढी आता उरली नाही.आमच्या देशातील
युद्धे फक्त सीमांपुरती राहतात,त्याच्याही झळा आमचे पराक्रमी सैनिक आम्हाला लागू
देत नाहीत.(अशा वेळी आपल्या एसी-ऑफिस मध्ये बसून एखाद्या गुलाबी पेपरची पान चाळताना
१५ ऑगस्टला आमच्या राष्ट्रवादाला जाग येते आणि त्याच दिवशी उतरते)हा त्रास
आम्हांला पूर्वजांच्या पुण्याईने सहन करावा लागत नाही हि खर तर त्यांची गंभीर चुक आणि
जेएनयुच्या घोषणाबाजी नंतर देशापेक्षासुद्धा आम्हाला पोलिटिकल स्कोर सेटल करणे जास्त
महत्वाच वाटत हि आमची चुक.
इथे ओवेसी भारताच्याघटनेचा संदर्भ देतात,म्हणजे बायकोला पोटगी देताना धर्मग्रंथाचा आधार घ्यायचा,आणि अडचण येईल तेव्हा राज्यघटना आठवायची(क्या बात हैं..!)घटना तर ३७० कलम हि तात्पुरती तरतूद होती,समान नागरी कायदा आणा असंही सांगते....!
म्हणूनच असदुद्दिन ओवेसी यांच विधान
गांभीर्याने घेण्याची गरज आहे,ते जीनांच्या पाऊलावर पाऊल ठेवणारं नाही ना हे देखील
बारकाईने अभ्यासायला हवं आहे,राजकारणाच्या गर्तेत ते अभ्यासण्याचा वेळ आणि विवेक कुणाला
नाही.सत्ता.सरकार,राजकीय पक्ष येतील-जातील पण देश या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे,हे तुम्ही-आम्ही
शिकलोच नाही...म्हणून ओवेसीसाहेब खरतर हमारा चुक्याच.
(छायाचित्र:इंरनेटवरून साभार)
(छायाचित्र:इंरनेटवरून साभार)

देशातील शांति या लोकांना बघवत नाहीं,माजलेला बोकड वेळिच कापला पाहिजे
ReplyDeletethere are many more serious issues to speak on but so we have some people like owaisi who prefer his time to be spent on nonsense ideologies....
ReplyDeleteif u respect ur country no matter what language what words are they there should not be a problem in speaking it.
God bless us...
Jai Hind...
Bharat mata ki jai.....