मदर तेरेसा यांचा संतपदाचा मार्ग आता प्रशस्त
झाला,ख्रिस्ती धर्मपरंपरेप्रमाणे दोन चमत्कार नावावर असल्याशिवाय संतपद मिळत
नाही.नेमक्या याच विषयावर परवा(दि.१७ मार्च) लोकसत्तात ‘असंताचे संत’ नावाचा
अग्रलेख प्रसिद्ध झाला.उत्तम अग्रलेखनासाठी लागणारे सर्व गुणवैशिष्ट्ये त्यात होते,तरीदेखील काल अचानक “क्षमस्व,आमच्या
संपादकीयमुळे काही लोकांच्या भावना दुखावल्याने आम्ही ते मागे घेत आहोत” अशी
दिलगिरी व्यक्त केली गेली.मुळात लोकसत्ता न वाचणारे आणि लोकसत्ताची मते न पटणाऱ्या
अनेकांनी त्यांची हुर्यो केली,“संपादकीय मागे घेतात का कुठे?”असे म्हणत कुबेरांना
पळपुटावैगेरे देखील टीका झाली.प्रत्येकाच्या विरोधाला आपआपली कारणे आहेत,पण सगळ
प्रकरण एकदा शांतपणे पाहिलं कि आपला विरोध नक्की कुणाला असायला हवा हे स्पष्ट
होईल.
लोकसत्ता अनेकदा टोकदार अग्रलेख लिहितो,आपल्या भूमिका निर्भीडपणे,कुठल्याही
राजकीय दबावाला न झुकता आणि त्याचा आपल्या खपावर काय परिणाम होईल याचा विचार न
करता मांडतो.किंबहुना मराठीत ‘अग्रलेख’ म्हणावा असं हे एकमेव वृत्तपत्र.(सामना हे
शिवसेनेचं ‘मुखपत्र’ आहे)आपल्या ९०० शब्दांच्या अग्रलेखात लोकसत्ता कुणाचाही मुलाहिजा
ठेवत नाही.मग ‘बळीराजाची बोंब’ मधून शेतकर्यांमधल्या वाईट प्रवृत्तींवर टीका करणे
असो किंवा ‘छगन सदन तेजोमय’ मधून भुजबळांची वाभाडी काढणे असो.याकुब मेननच्या
फाशीचा त्यांनी केलेला विरोध हा सप्रमाण आणि तार्किक होता.देशातल्या अनेक
वृत्तपत्रांनी तो केलाच.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दिल्या जाणऱ्या
महाराष्ट्रभुषणवर जेव्हा वाद चालू होता तेव्हा त्यावर आग्रही प्रतिपादन घेऊन बाबासाहेबांची
बाजू घेणारा अग्रलेख कुबेरांनी लिहिला होता(हे आपण सहज विसरतो) FTII च्या विद्यार्थ्यांच
आंदोलन असो किंवा जेएनयुच्या..लोकसत्ताची संपादकीय भूमिका ही अनेकदा संयत आणि
संयमी राहिली आहे.
‘असंताचे
संतपण’ हा अग्रलेख (वाचताना तरी) सप्रमाण आणि ससंदर्भ वाटतो.मदर तेरेसांच्या
कार्याला असेलेली धर्मप्रचाराची किनार त्यातून त्यांना मिळालेलं नोबेल आणि आता
चालून आलेलं संतपद हा या लेखाचा मुख्य गाभा.मदर तेरेसांच्या ख्रिस्ती धर्मप्रसारक
म्हणून केलेल्या कामाला हात घालताना राजसत्ता आणि धर्मसत्तेच्या पारंपारिक
द्वंद्वालादेखील त्यांनी चर्चेत आणले.हिंदुधर्मातील अपप्रवृत्तींवर टीका करणारे
अशा वेळी शांत बसतात आणि केवळ हिंदूधर्मचिकित्सा करून आपण स्वत:ला निधर्मी
म्हणवतात.या सुधारणावादी आणि पाखंडी निधर्मीवाद्यांचा समाचार त्यात घेतला गेला.
या
लेखाला संदर्भांची जोड होती,लोकसत्तासारख्या दैनिकातून तो प्रकाशित झाला होता. ‘Journalism of courage’ सारखं ब्रीद मिरवणाऱ्या express ग्रुपचे हे दैनिक.आणीबाणीपासून आज पर्यंत म्हणजे
देशातील तथाकथित असहिष्णुता वाढत असताना त्याला कधी आपले संपादकीय मागे घ्यावे लागलेले
नाही..मग नेमकी हीच वेळ काल का आली?ख्रिस्ती धर्मप्रसाराबद्दल काही लिहिल्याने तर
अशी वेळ आली नाही ना?(तसही पेपर केरळात नाही महाराष्ट्रात चालतो)एरवी अभिव्यक्ती
स्वातंत्र्याचा संकोच झाला म्हणून गळा काढणारे आता सोईस्कररित्या मीठाची गुळणी
धरून बसतात.त्यामुळे लोकसत्ताची माफी जितकी धक्कादायक आहे तितकीच ती
अनपेक्षितही.यानंतर कुणाच्याही भावना दुखावल्याचं कारण देत संपादकीय मागे घ्यायचा
अनर्थकारी पायंडा पडेल ही जितकी भीती आहे तितकीच गोष्टी समजावून न घेता टीका
करण्याचा आमच्या वृत्तीचा देखील.
संपादकीय
मागे घेऊन जिथे लोकसत्ताने अनेक प्रश्न आणि वादांना बगल दिली असे म्हणणे म्हणूनच
गैर ठरते.प्रत्यक्ष अग्रलेखाने जितके प्रश्न उपस्थित केले नव्हते तितके प्रश्न या
एका माफीने उपस्थित केले.कारण शेवटी पत्रकारिता ही नवीन प्रश्न निर्माण करण्यासाठी
असते आणि लोकशाही ही उत्तरे शोधण्याकरीता....!

mi to paper ch vachan band kelay........
ReplyDelete