रघुरामे तुवा केलीये निर्धार
सामान्याचा कैवार कोण आता ।
जागेची बैसोनि नियंत्रीले पत
तुझे पद आता कोण सांभाळतो ?
परकीय चलनाचा राखला हो दर
रेपोरेटचे धनुष्य हाती तुझा ।
जगातील तु उरला शेवटला अर्थतज्ञ
व्यवस्थेला दुजा त्राता नाही कुणी ।
डब्यातला चहा सरला कधीच
उपीटाचा रवाही संपला पहा ।
घराच्या भाड्याचा थकला रे हप्ता
पोरालाही दप्तर जुनेच देतो ।
झालेत बघ सारे विशोत्तरी तीन
तरी आम्ही का दीन सांग 'रघुराया'।
रामकृष्णा वाचोनी चालिले हे जग
परि आम्हांसी गव्हर्नर मिळेचीना ।
निखा म्हणे सारा पालथा बाजार
आमच्या नशिबाचे दार बंदची गा ।।
-निखील©
Monday, 20 June 2016
रघुराम प्रशस्ती
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment