सुलतान
सलमान खानचा बहुप्रतिक्षित सुलतान आज प्रदर्शित झाला.एक पैलवान त्याची महत्वकांक्षा आणि त्याचं प्रेम याभोवती फिरणारी हि कथा.सुलतान(सलमान खान) हा हरियाणातला एक उनाड मुलगा आरफाच्या(अनुष्का शर्मा) प्रेमात पडतो आणि तिला impress करायला म्हणून पैलवानी सुरु करतो.'तुझ्या आयुष्यात काहीच लक्ष्य नाही' म्हणून आरफा त्याला नाकारते तेव्हा जिद्दीने पेटलेला सुलतान खुप कष्ट घेऊन पैलवान म्हणून नावारूपाला येत जातो.अगदी ऑलिम्पिक गोल्ड मेडल सुद्धा जिंकतो पण यानंतर त्याच्या कौटुंबिक आयुष्यात आलेली वादळं आणि त्यातून त्याच कुस्तीला रामराम ठोकण (पुन्हा एकदा) आरफाला मिळण्यासाठी एका wrestling league मध्ये भाग घेतो आणि शेवटी भारतीय चित्रपट परंपरेला साजेल असा जिंकतो,त्याच कौटुंबिक जीवन सुरळीत सुरु होतं. '...ते दोघे सुखाने नांदू लागले'च्या चालीवर चित्रपट संपतो.
या चित्रपटाची मुख्य ताकद आहे ती म्हणजे अर्थातच सलमान.पैलवान सुलतान खान दिसण्यासाठी त्याने अपार मेहनत केली आहे.पन्नाशीत अशा पद्धतीची body केवळ सलमानच बनवू शकेन.त्याचं हरियाणवी बोलणं,त्याच चालणं कुस्तीचे असतात ते डाव हे सगळं तुम्हांला खिळवून ठेवतं.अनुष्का शर्माचा अभिनयही चांगला आहे.Punjabi girl साकारण्यात तिची हातोटी तिने पुरेपूर वापरली आहे.म्हणजे आजवरच्या बऱ्याच चित्रपटात तिने साकारलेल्या पंजाबी मुलीपेक्षा आरफा वेगळी आहे.रणदीप हुडाला काम छोट आहे पण जे मिळालंय त्याच त्याने सोनं केलंय,खरं कौतुक करावं वाटतं अमित सिधचं,चित्रपट पुढे नेण्याचं काम तो लीलया करत जातो.परीक्षित सहानी साहेबांचं दर्शनही सुखावह ठरत.विशाल-शेखरनी गाणे चांगले बनवलेत,cinematographही उत्तम.कुस्तीचा थरार अक्षरशः उभा राहावा म्हणून cameramanला द्यावं तेवढं श्रेय कमीच आहे.चित्रपट प्रवाही झाला आहे आणि प्रभावी देखील त्याचा वाटा अर्थातच अली अब्बास जफर या दिग्दर्शकाचा.
एकूणच सलमान एके सलमान आणि सलमान दुणे दोनशे कोटी हे समीकरण सुलतानाही कायम ठेवेल. यात शंका नाही.
Wednesday, 6 July 2016
सुलतान:चित्रपट समीक्षण
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment