तामिळनाडूचं राजकारण हे उत्तरेतील राजकारणापेक्षा वेगळं. पेरियार यांच्या जस्टीस पार्टीला मोठं जनसमर्थन होतं, त्यांचे अण्णा दुराई यांनी ते व्यवस्थित राजकीय चातुर्याने निवडणुकीच्या राजकारणात वापरलं आणि पक्षाचे नावच बदलले. हा नवीन पक्ष म्हणजे द्रविड मुनेत्र कळघम; द्रविडांच्या उद्धारासाठीची संघटना.दलित-पीडितांच्या मागण्यांसाठी, न्याय-हक्कांसाठी लढणारा पक्ष म्हणून द्रमुक उदयाला आला,निवडणुका जिंकल्या. स्वतःच्या ताकदीवर बहुमताने विधानसभा जिंकणारा तो देशातील पहिला पक्ष यावरून अंदाज येईल त्याच्या ताकदीचा.
अण्णा दुराई यांच्या नंतर पक्षाची धुरा करुणानिधी यांच्याकडे गेली आणि सत्तासंघर्षाच्या या टप्प्यावर करुणानिधी यांनी स्वतः पक्षात आणलेल्या, त्यांच्या जीवलग मित्राने, एम जी आर याने वेगळी चूल मांडली १९७७ साली.अण्णा द्रमुक या नावाने पक्ष काढून. पक्ष बदलला पण मागासवर्गीय जातींच्या हक्कासाठी आपली भूमिका आहे हे एमजीआर यांनाही सांगायचे होते.एमजी आर यांच्यानंतर पक्ष ताब्यात घेतला जयललिता यांनी. मग तामिळनाडू जनतेने कधी करुणानिधी,कधी जयललिता अशी भाकरी फिरवत सत्तांतरे केली. त्या prediction ला धक्का लावून यावेळी जयललिताबाई सत्तेत आल्या होत्या,त्याच वर्षी त्या निवर्तल्या. त्यांच्यानंतर पक्षात जनमान्य नेतृत्व नाही.
दुसरीकडे करुणानिधी आणि द्रमुक फक्त त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित आहे. कौटुंबिक कलह आहे,त्यातूनच अलगिरी यांना पक्ष सोडावा लागला. स्टॅलिन यांच्या खऱ्या क्षमता अजून गुलदस्त्यातच आहेत.
थोडक्यात सांगायचं झालं तर तामिळनाडूचं राजकारण गेली ५० वर्षे द्रविडकेंद्री आहे अगदी ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या जयललिता यांनी अंत्यविधीला दफनविधीचा पर्याय निवडला यावरून त्याची व्याप्ती लक्षात येते.एका बाजूला वैचारिक आणि दुसऱ्या बाजूला नेतृत्वाची अशी समांतर पोकळी भरण्यासाठी कमल हसन सरसावतोय,त्याच्या विधनांना राजकीय गरज यांपेक्षा जास्त महत्व नाही. हे वास्तव समजावून घ्यायला हवं.
No comments:
Post a Comment