एका कवीच आयुष्य
असतच तस जगावेगळ,
डागाळलेल्या पातेल्यातुन
घोटभर चहा उकळवताना,
तो बघतो कवितेत
स्वर्गातल्या अमृताची सुवर्णपात्रे,
त्याच्या कळकट्ट घराची तावदानं
सकाळी किलकिली करताना...
लिहीता येतात त्याला रम्य सूर्योदयाची वर्णन.
दारात आलेले चिमणे-कावळेही
त्याला मोर-राजहंस वाटू शकतात.
रस्त्यावरच्या पाणवठ्यातुन
मानससरोवराचा भास होतो त्याला,
घराच्या गळक्या कौलातुन
ठिबकणार पाणी बघताना
अनुभवतो श्रावणसरीची तीव्र झरझर...
चंद्राच्या चटोर किरणात सापडतो त्याला रोमान्स
आणि कुब्जेच्या कुबडात सौंदर्यदेखील.
जुन्या फ्लाँवरपॉटमधला निष्प्राण फुलात
तो हुंगतो बकूळाचा सुगंध
घरातल्या एखाद्या तुटक्या फ्रेमवर
लिहीता येत त्याला महाकाव्य.
आयुष्याची जीवनगाणी संपवून,
आपल्या निष्प्राण कुड़ीला
जेव्हा फेकल त्याने दुनियेबाहेरच्या निर्वातात
(तसा तो या जगी होताच कधी म्हणा !)
तेव्हा उरली होती मागे
एक जीर्ण वही,
एक गळकं शाईच पेन,
आणि जन्मभर पुरणार आनंदाच संचित....!
-निखील
Wednesday, 30 December 2015
एक कवी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment